Type Here to Get Search Results !

डिसेंट फाउंडेशनच्या वतीने जुन्नरला दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन.

 


प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

जुन्नर, पुणे (३० ऑक्टोबर २०२५) –

जुन्नर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रमामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



या शिबिरात एकूण ९३ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ३७ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले.

गेल्या दोन वर्षांत डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील ४ हजारांहून अधिक नागरिकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.



शिबिरात रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्यांची औषधे या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येतात, अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक श्री. जितेंद्र बिडवई यांनी दिली.



या शिबिराचे उदघाटन जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल रोकडे, हभप भगवान महाराज खेडकर व अर्जुन महाराज शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण,माजी मुख्याध्यापक प्रकाश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पुंडे, शंकरा आय हॉस्पिटलचे समन्वयक प्रकाश पाटील ,तज्ञ डॉक्टर व व त्यांची संपूर्ण टीम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments