प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ 3फार्मसी,बेल्हे या महाविद्यालयांच्या वतीने आयपीए (IPA) आळेफाटा शाखा आणि जुन्नर, आंबेगाव, खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'जागतिक फार्मासिस्ट दिना' च्या निमित्ताने "थिंक हेल्थ,थिंक फार्मासिस्ट" या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आरोग्य सेवेतील योगदानाविषयी जनजागृती करण्यासाठी 'फार्मा रॅली-२०२५' चे आयोजन नारायणगाव बस स्टँड या ठिकाणी आयोजित केल्याची माहिती प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व डॉ.संतोष घुले यांनी दिली.
फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चरक–सुश्रुत व्याख्यानमाले अंतर्गत पहिल्या दिवशी “प्रमुख कंपन्यांना आवश्यक कौशल्ये आणि इंटर्नशिप व प्लेसमेंट तयारीसाठी व्यावहारिक माहिती” या विषयावर शुभम नवले, प्रोजेक्ट मॅनेजर, बॉश टेक्नॉलॉजीज तसेच डेटा सायंटिस्ट, इंफीहील हेल्थटेक यांनी मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन केले.इंटर्नशिप व प्लेसमेंट प्रक्रियेसाठी तयारी करताना कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.
दुसऱ्या दिवशी “औषधनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) क्षमता” या विषयावर डॉ.अन्वर शेख,प्रोफेसर, पुणे यांनी विद्यार्थ्यांसोबत भविष्यातील फार्मासिस्टनी नवनवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित करण्यात आले.
“स्पर्धा परीक्षा तयारी: GPAT, NIPER व अन्य शासकीय परीक्षा” या विषयावर डॉ.विजयकुमार चाकोते,संचालक, फार्मास्टार अकॅडमी यांनी मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी “डिकोडिंग फार्मा : द आर्ट अँड सायन्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग फ्लो” या विषयावर डॉ. संजय लाडे, वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ, ग्लेनमार्क रिसर्च सेंटर अँड फार्मास्युटिकल्स यांनी विचार मांडले.
यादरम्यान प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, फार्माड्रामा,भित्तीपत्रक सादरीकरण, रील बनवणे अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळाली तसेच फार्मसी क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन व संधी यांची माहिती घेता आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले,विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे, प्रा.नितीन महाले, डॉ. शितल गायकवाड,डॉ.बिपिन गांधी,डॉ.मंगेश होले,प्रा.सुजित तांबे, प्रा.अजय भागवत, प्रा.गणेश लामखडे, प्रा.अक्षय फुलसुंदर,सर्व शिक्षक कर्मचारी यांनी नियोजन केले.
कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या आणि यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सूत्रसंचालन प्रा.प्राची पडवळ यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शुभम गडगे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments