प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
निकालस फाउंडेशन नागपूर संचलित शैक्षणिक अध्ययन अनुभव अभ्यासक्रम व ऋषिकेश परिवार जुन्नर यांच्या प्रयत्नातून जुन्नर तालुक्यातील 15 शाळांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. . या साहित्याचे वितरण आज करण्यात आले. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्रतिनिधी व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. या शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव व शिक्षण देण्यासाठी चांगला उपयोग होणार आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे गोडी लागावी याकरता मी निकालस फाउंडेशन करत असलेल्या कामाचे सर्वांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी ऋषिकेश परिवाराचे सर्वेसर्वा श्री.सुरेश जोशी यांनी निकालस फाउंडेशन व ऋषिकेश परिवार यांनी केलेले सहकार्य,सामाजिक कार्याची माहिती दिली.
व फाउंडेशन च्या माध्यमातून सर्व शाळातील शिक्षक बंधू भगिनींना प्रशिक्षणात वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती दिली. आज संस्थेने दिलेल्या कीटचे वाटप उच्छिल व खामगाव शाळेत शालेय व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत स्विकारण्यात आले आहे.
त्याच बरोबर सुभाष मोहरे,यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. बाळासाहेब लांघी
यांनी आपले मनोगत व्यक्त करून फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
त्याच बरोबर समन्वयक
श्री.अंकुश कोकणे यांनी सर्व .शाळांच्या वतीने निकालस फाऊंडेशन नागपूर यांचे आभार मानले.




Post a Comment
0 Comments