जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा नगदवाडीला वाचनालयासाठी कविताताई संदिपान पवार यांच्या वतीने 50 दर्जेदार पुस्तके भेट स्वरूपात देण्यात आली. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृती समृद्ध व्हावी या उद्देशाने ही पुस्तके शाळेला भेट स्वरूपात देण्यात आल्याची माहिती नगदवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बाळासाहेब बढे यांनी दिली.
या कार्यक्रमप्रसंगी नगदवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख वनिता बाळकृष्ण हांडे,नगदवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला गुलाबराव बोऱ्हाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे,जुन्नर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे,शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्ष दिपाली जाधव,सदस्य रघुनाथ बढे,महेश बढे,निवृत्ती बढे,विश्वास बढे, दिलीप कुतळ,बाबाजी बढे,बाळू गाडगे,सुनंदा भापकर,दत्तात्रय गाडगे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षक मंगेश मेहेर,पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर,उज्वला कांबळे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.

Post a Comment
0 Comments