प्रतिनिधी घोडेगाव | सुरंजन काळे
घोडेगाव (ता. आंबेगाव) जवळील आंबेशेत परिसरात
रात्री एक बिबटा जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले आहे. काही दिवसांपासून
हा बिबट्या परिसरातील पाळीव प्राणी यांच्यावर हल्ले करून फस्त करत होता.
मनोज गजानन काळे यांच्या डोंगराजवळील शेतात लावलेल्या पिंज-यात हा बिबटया सोमवारी रात्रीच्या दरम्यान अडकला.
आंबेशेत येथे रविवारी दिवसा दुपारच्या वेळी एका बिबटयाने धनगाराच्या मेंढयांच्या कळपातील एका शेळीवर हल्ला करून शेळीचा फडशा पाडला. त्यावेळी वनविभागाला याची माहिती मिळताच त्यांनी त्वरीत संबंधित ठिकाणी पिंजरा लावला. सोमवारी रात्रीच्यावेळी बिबटया पिंज-यात जेरबंद झाला. मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंजरा वन विभागाच्या गाडीत चढविण्यात आला. मनोज काळे, राजू काळे, दादाभाऊ झोडगे, संतोष काळे, शिवाजी काळे यांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर व त्यांची टिम त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान अजुनही या परिसरातमध्ये तीन बिबटे असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
आंबेशेत येथे पिंज-यात जेरबंद झालेल्या बिबटयाचे अंदाजे वय ६ वर्षे असून त्याची शारिरीक स्थिती सुदृढ आहे. जेरबंद झालेल्या बिबटयाला सदयस्थितीत माणिकडोह बिबट निवारा केंद जुन्नर येथे ठेवण्यात आले असुन वनतारा, गुजरात येथे पाठविण्याची परवानगी मिळाल्यावर पुढे पाठवण्यात येणार असल्याचे, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सांगितले.
तुकाराम काळे म्हणाले ,
शिंदेवाडी, परांडा, कोळवाडी ,नारोडी या भागातही
मोठ्या प्रमाणात बिबट्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असल्यामुळे बिबट्या दिवसाढवळ्या दिसत आहे. दरम्यान एक महिन्यापासून या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्वच ठिकाणी पिंजरे लावून बिबट्या जेरबंद करावा

Post a Comment
0 Comments