प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेधर येथे केंद्र.. डिंभे वसाहत येथे केंद्र पातळी वरील यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन गावचे लोकनियुक्त सरपंच शंकर गांगड उपसरपंच कोकणे मॅडम यांनी केले. त्यावेळी उद्योजक महेश शेजवळ, मनोज आण्णा कोकणे, आनंद राक्षे, शिनोली शाळेचे व्यवस्थापन चे अध्यक्ष मा. बाळकृष्ण बोहाडे सदस्य दिनेश बोऱ्हाडे ज्योती बोऱ्हाडे. पालक शिनोली शाळेच्या मुख्याध्यापिका विना फदाले व सर्व शाळांतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी पालक व बहूसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक शिक्षकांना मार्गदर्शन केंद्रप्रमुख अंकुश बडे साहेब यांनी केले.
या स्पर्धेत शिनोली केंद्रातील पोखरकरवाडी ठाकरवाडी शिनोली मायंबा वाडी फदाले वाडी उगलेवाडी सुपेधरया सात शाळांनी सहा ते नऊ वयोगटातील 130खेळाडू सहभागी झाले होते स्पर्धेत खो-खो, कबड्डी ,लेझीम, वैयक्तिक धावणे ,लांब उडी ,उंच उडी ,लंगडी चमचा लिंबू, बडबडगीत , लोकनृत्य, कविता गायन,बेडूक उडी ,बुद्धिबळ, वै .गायन , भजन, प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांचा समावेश होता अतिशय खेळी मेळीच्या व आनंददायी वातावरणात स्पर्धा पार पडली या स्पर्धेत पंच व गुणलेखक म्हणून सुलोचना बेंढारीचंद्रकला शिंगाडे, शैला रांजणे मॅडम,अनिता लांडे ,क्षीरसागर सर , उगले मॅडम, लेंभे सर, गवारी सर, तळपे सर, वारे मॅडम , लोहोकरे सर, जाधव मॅडम, पंधारे मॅडम , असवले सर, बांबळे सर , उतळे मॅडम यांनी काम पाहिले या स्पर्धेत शिनोली मॉडेल स्कूल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली या शाळेने बाजी मारली अतिशय कमी वेळात स्पर्धाची तयारी असून देखील सर्व क्रीडा व सांस्कृतिक कमी वेळात सर्व स्पर्धेचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेधर येथील शिक्षक मुख्याध्यापक तुकाराम लेंभे सर आणि रोहिदास गवारी सर यांनी केले सहभागी स्पर्धक व पाहुणे यांना मिष्टान्नाचे भोजन दिले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेधर, मायंबावाडी,शिनोली पोखरकरवाडी, ठाकरवाडी, फदालेवाडी, उगलेवाडी या सर्व शाळांमधील सर्व सहभागी व विजयी स्पर्धकांचे लोकनियुक्त सरपंच शंकर गांगड सत्कार केला


Post a Comment
0 Comments