प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
७६ वा संविधान दिन व उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन कार्यक्रम
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालयात ७६ व्या संविधान दिनानिमित्त व्याख्यान व भारतीय संविधान उद्देशपत्रिकेचे सामूहिक वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून जुन्नर वकिल बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड अरुण गाडेकर होते.
तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे होते.प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी,दर्शन सोनवणे,रुनीत वायकर व उपप्राचार्य व समन्वयक प्रा प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते,कला विभागप्रमुख प्रा राजेश शिप्पूरकर,एनएसएस विभागप्रमुख डॉ महेंद्र कोरडे, प्रा विक्रम रसाळ व प्राध्यापक वृंद , विद्यार्थी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा शरद मनसुख यांनी केले तर पाहुण्याचा परिचय प्रा योगेश घोडके यांनी करून दिला.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते ॲड अरुण गाडेकर यांनी संविधान निर्मिती प्रक्रिया व उददेश स्पष्ट करताना म्हटले भारतीय संविधान हा सर्व भारतीयाचा पवित्र ग्रंथ आहे.
लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकांनी संविधान आत्मसात केले पाहिजे.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी भारतीय लोकशाही व संविधानाचे महत्व विशद करताना उददेशपत्रिका हा संविधानाचा आत्मा व खऱ्या अर्थाने घटनेचा सार आहे असे म्हटले आहे.यावेळी एनएसएस विभागप्रमुख डॉ महेंद्र कोरडे यांनी उददेशपत्रिकेचे सामूहिक वाचन केले.तसेच २६ नोव्हे २००८ रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या शहीद जवान व पोलिस अधिकारी व सामान्य नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कविता शिंदे व आभार प्रा गणेश रोकडे यांनी मानले.



Post a Comment
0 Comments