प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
26 नोव्हेंबर संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो 1949 मध्ये आजच्याच दिवशी भारतीय संविधान सभेने देशाचे संविधान स्वीकारले होते याच धर्तीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली येथे संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.मुख्याध्यापक सौ विना सदगीर यांनी संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचेपूजन केले.संविधानाचे महत्त्व आणि त्याची मूलभूत मूल्य याविषयी श्रीमती रांजणे मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली देशभक्तीपर व संविधानावर आधारित घोषवाक्यांच्या घोषणा दिल्या गावांमध्ये सर्व ठिकाणी प्रभात फेरी फिरवण्यात आली.
ग्रामपंचायत जवळ मुलांनी संविधानावर आधारित इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती केली यानंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या चित्रकला रंगभरण व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. वेशभूषा सादर केल्या. संविधानावर आधारित नृत्य सादर केले.सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांच्या सेल्फी काढण्यात आल्या.शिक्षक व विद्यार्थ्यांनी उद्देशिकांचे सामुदायिक वाचन केले आणि त्याचे महत्त्व व मूल्यांना जाणून घेऊन त्यांचे पालन करण्याचा संकल्प केला.शाळेमध्ये छोटीशी बाल सभा घेतली. त्यामध्ये व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण बोराडे व इतर सर्व सदस्य हजर होते.सर्व उपक्रम व कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्रीमती बेंढारी मॅडम ,श्रीमती शिंगाडे मॅडम ,श्रीमती लांडे मॅडम, श्रीमती रांजणे मॅडम ,व श्री. क्षीरसागर सर यांनी दिवसभर परिश्रम घेऊन कार्यक्रम छान प्रकारे पार पडला अशा प्रकारे उत्सव लोकशाहीचा साजरा करण्यात आला.


Post a Comment
0 Comments