Type Here to Get Search Results !

समर्थ फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांची अश्वमेध साठी निवड, सहा झोनमधून १८० विद्यार्थ्यांचा सहभाग



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरविभागीय खो-खो स्पर्धा नुकतीच समर्थ शैक्षणिक संकुल येथे पार पडली.

या आंतरविभागीय स्पर्धेत पुणे, कोल्हापूर,सोलापूर,संभाजीनगर, जळगाव व नागपूर अशा सहा झोन मधून एकूण १८० विद्यार्थी व २० टीम मॅनेजर आणि क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवला अशी माहिती विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे प्रतिनिधी प्रा. भोईर यांनी दिली.



अंतिम फेरीत दोन विभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-

खो-खो (मुलांचा गट)

विजेतेपद – कोल्हापूर विभाग

उपविजेतेपद – सोलापूर विभाग



खो-खो (मुलींचा गट)

विजेतेपद–सोलापूर विभाग

उपविजेतेपद–कोल्हापूर विभाग

स्पर्धेतील उत्तम खेळाडू,फिटनेस आणि संघातील सक्रिय सहभाग यानुसार विद्यापीठ पातळीवर खो-खो संघामध्ये एकूण मुले व मुली मिळून ३० खेळाडूंची निवड करण्यात आली. निवड समितीतील पंच व क्रीडा अधिकारी यांनी पारदर्शक व काटेकोर निवड प्रक्रियांचे पालन केले.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अश्वमेध साठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, पुणे क्रीडा विभागाचे सेक्रेटरी प्रा.एच पी नरसुडे,संकुलातील क्रीडाशिक्षक सुरेश काकडे तसेच विभागप्रमुख यांनी दिली.

सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले तसेच संकुलातील सर्व प्राचार्य विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments