प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर, पुणे (३० नोव्हेंबर २०२५) –जुन्नर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रमामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे व शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. तसेच विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांच्या वतीने देखील विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात एकूण १३८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ४६ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले.
गेल्या दोन वर्षांत डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील ४ हजारांहून अधिक नागरिकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
शिबिरात रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्यांची औषधे या सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येतात, अशी माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक श्री. जितेंद्र बिडवई यांनी दिली.
कार्यक्रमाला डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे, शंकरा आय हॉस्पिटलचे प्रकाश पाटील ,डॉ.पूनम जुनेजा, व व त्यांची संपूर्ण टीम,विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ आशुतोष बोळीज, दयानंद गायकवाड व त्यांची सर्व टीम, गणेश मेहेर,योगेश वाघचौरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments