Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती कनिष्ठ महाविदयालयात वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन संपन्न.



वार्ताहर : प्रा. निलेश आमले सर

जुन्नर,ता.१८ श्री शिव छत्रपती महाविद्यालयात वाङ्‌मय मंडळ विभागाच्या वतीने साहित्य व मराठीतील प्रवासवर्णनपर लेखनात स्त्रियांचे योगदान या विषयावर डाॅ.मनिषा बाळासाहेब कवडे यांचे साहित्यावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी त्यांनी विविध उदाहरणे देऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रवासाचा अनुभव कसा घ्यावा व वाचाल तर वाचाल या विषयी विशेष मार्गदर्शन केले. तसेच या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांचे स्केच काढून त्यांची माहिती दिली.वाङ्‌मय मंडळाच्या बॅनरचे गुलाबपुष्पांनी व रिबिन कापून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी भूषविले.अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी साहित्याची व वाचनाची गोडी कशी निर्माण करावी.साहित्यीकांवर स्केच काढणाऱ्या विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करुन त्यांच्या कलेला वाव मिळवून देण्यासाठी काही उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी मा.प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, ज्युनिअर समन्वयक प्रा.पी.एस.लोढा यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाङ्‌मय विभाग प्रमुख प्रा.आर.सी.माने यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.एस.के.कोकणे यांनी करून दिला.तसेच या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही.एच.सावंत यांनी तर आभार प्रा.पी.एस.मनसुख यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाङ्‌मय मंडळातील सर्व सदस्य, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments