Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये गणित दिन व विज्ञान अपूर्व मेळावा उत्साहात संपन्न



प्रतिनिधी : सुरंजन काळे

घोडेगाव: आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित,घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विज्ञान अपूर्व मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते. 



संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष एडवोकेट संजय आर्वीकर कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे ,सचिव श्री .विश्वासराव काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री सोमनाथ काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे यांच्या हस्ते विज्ञान अपूर्व मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. 



या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्ताचे श्री निलेश पोखरकर हे उपस्थित होते. आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील संशोधनात करिअर करण्यासाठी विविध संधी उपलब्ध असल्याचे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थी या क्षेत्रात अधिकाधिक सहभागी व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत इयत्ता नववीचा कु. यशवंत हिंदुराव गेजगे यांनी केले. गणित दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते गणितज्ञ रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री कैलास जाधव व श्रीमती अक्षया भेके त्यांनीआपल्या भाषणांमधून विज्ञान व गणित विषयाचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून दिले. या विज्ञान मेळाव्यात इ. चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी ग्रीन हाऊस, आदर्श गाव, पर्यावरण रक्षण, पावसाच्या पाण्याचे नियोजन, सौर उर्जेवर आधारित विविध मॉडेल्स बनवले होते. 



विज्ञान अपूर्व मेळाव्याच्या निमित्ताने विज्ञान विषयावर आधारित प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी डोळसपणे अवतीभवतीच्या घटनांकडे पाहिले पाहिजे आपली निरीक्षण क्षमता जोपासली पाहिजे,प्रत्येक घटनेमागील कारण शोधण्याची जिज्ञासा अंगी बाळगली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने विज्ञान आणि आपले ज्ञान समृद्ध होईल असा बहुमोल संदेश संस्थेचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.श्री सोमनाथ काळे यांनी देखील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांचे. विशेष कौतुक केले.या विज्ञान अपूर्व मेळाव्याचे परीक्षक म्हणून श्री संजय कदम , सौ.हुदा शेख अक्षया भेेके व श्री कैलास जाधव यांनी काम पाहिले. गणित दिनानिमित्त इयत्ता चौथी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात आठवडे बाजार भरविला होता तसेच खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स देखील लावले होते. या आठवडे बाजारास विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला .मेळाव्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा , उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी , पर्यवेक्षिका वंदना वायकर , विषय शिक्षक श्री कैलास जाधव व श्रीमती हुदा शेख, सौ ज्योती जाधव,श्रीमती सुप्रिया मंडलिक, सौ संगीता करपे, सौ पूजा विश्वासराव, सौ जुई काळे, सौ . तरन्नुम शेख यांचे सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यालयाचे आदर्श कलाशिक्षक श्री समीर मुजावर तसेच श्री.चेतन पोखरकर यांचे देखील बहुमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments