Type Here to Get Search Results !

घोडेगाव येथील इंग्लिश मिडीयम च्या स्काऊट गाईड पथकाचे एक दिवसीय शिबिर भीमाशंकर येथे संपन्न.



घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे

आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव, मधील शाळेतील इयत्ता १० वी च्या स्काऊट गाईड पथकाचे एकदिवसीय शिबिर भीमाशंकर या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. शंकर अभयारण्य मधील वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती घेतली. तिथे स्काऊट गाईडची प्रार्थना, झेंडा गीत. तसेच इतर अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. स्काऊट गाईडच्या विविध उपक्रमांचा या शिबिरात समावेश करण्यात आला होता. फक्त भीमाशंकर हनुमान तळे कोकणकडा इत्यादीअनेक ठिकाणांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. असलेल्या अनेक फळझाडे, फुलझाडे, प्राणी, पक्षी यांचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. सर्व विद्यार्थ्यांनी चुलीवर स्वतः जेवण तयार करून वनभोजनाचा आस्वाद घेतला. अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात स्काऊट गाईडचे भीमाशंकर येथील एक दिवसीय शिबिर पार पडले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्काऊट गाईडच्या शिक्षिका सौ.ज्योती रोकडे, तसेच उपप्राचार्या रेखा आवारी, वर्ग शिक्षिका सौ ज्योती जाधव, सौ हुदा शेख, श्री. सुरज काळोखे,सौ नलिनी तिटकारे,श्री लीलाधर लांडगे, श्री संदीप गावडे हे विद्यार्थ्यांसोबत होते. हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष श्री एडवोकेट संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव श्री विश्वास काळे, समन्वय समितीचे चेअरमन श्री राजेश काळे, संस्थेचे खजिनदार श्री सोमनाथ काळे, संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संचालक श्री. अजित काळे व श्री अक्षय काळे काळे, विद्यालयाच्या प्राचार्य मेरी फ्लोरा डिसोजा उपप्राचार्या रेखा आवारी व पर्यवेक्षिका सौ वंदना वायकर यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments