दि.२५ डिसेंबर ऐतिहासिक बुध्दमुर्ती स्थापनेचा ७१ वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
संस्थेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन एडवोकेट सुभाष जवंजाळे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिसर हेडकॉटर प्रमुख आयुष्यमान एस के भंडारे साहेब तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आयुष्यमान जगदीश गवई साहेब ट्रस्ट डॉ.राजाराम बडगे ट्रस्टी अरुण पोळ सर महाराष्ट्राचे अध्यक्ष यु जी बोराडे गुरुजी समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर डी एम आचार्य सर असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे सर पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष बी जी घाटे, व त्यांची पूर्ण कार्यकारणी पुणे महानगराचे अध्यक्ष राजरत्न थोरात व त्यांची पूर्ण कार्यकारणी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष आयुमती. मंदाताई गजरे यांनी स्रीमुक्ती दिना निमिती व्याख्यान दिले पुणे महानगराच्या अध्यक्ष आयुमती सुनीताताई रोकडे व त्यांची पूर्ण कार्यकारणी हजर होती इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ स्वागताध्यक्ष राधाकांत कांबळे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगर जिल्हा, सुत्र संचालन आयु. दलितानंद थोरात सरचिटणीस पुणे जिल्हा पश्चिम यांनी केले तर आभार रवींद्र अभंग कोषाध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम यांनी मानले.
देहूरोड पोलीस स्टेशन निरीक्षक विक्रम बनसोडे सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना देऊन नेत्रदीपक मनोवेधक संचलन केले वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड बुद्ध विहारा पर्यंत भिक्कू संघ समता सैनिक दल आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर, रिपोर्टिंग ट्रस्ट चेअरमन एडवोकेट सुभाष जोजाळे साहेब यांच्यासमवेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते
सर्वांनी भोजन केल्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
जय भीम नमो बुद्धाय



Post a Comment
0 Comments