प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ,जुन्नर संचलित श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर,डायमंड पब्लिकेशन व सकाळ पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार,दि. ०५/१२/२०२५ रोजी भव्य ग्रंथप्रदर्शन व विक्री उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रा.डॉ.एम.बी.वाघमारे यांच्या हस्ते झाले.या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी मा.प्रा. व्ही.बी.कुलकर्णी,महाविद्यालयचे उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.डी.चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.पी.एस.लोढा,प्रभारी प्रबंधक प्रा.सौ.एम.डी.कोरे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हे ग्रंथप्रदर्शन शुक्रवार,दि. ०५/१२/२०२५ ते रविवार, दि. ०७/१२/२०२५ या कालावधीत महाविद्यालयातील ग्रंथालयात सकाळी ०९.०० ते रात्री ०८.०० वा पर्यंत सर्व विद्यार्थी व नागरिकांसाठी खुले असणार आहे,असे डायमंड पब्लिकेशनचे श्री.दत्तात्रय पाष्टे यांनी सांगितले.या भव्य ग्रंथप्रदर्शनात सुमारे ५० प्रकाशकांची मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील सुमारे २५ हजार पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत,असे महाविद्यालयाच्या प्रभारी ग्रंथपाल सौ.व्ही.ए.चव्हाण यांनी सांगितले.या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ सर्व विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा.असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment
0 Comments