Type Here to Get Search Results !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कारासाठी कवी-लेखक यशवंत घोडे फोफसंडीकर यांची गौरवपूर्ण निवड.



जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले, अकोले तालुक्यातील फोफसंडी गावचे सुपुत्र, कवी-लेखक यशवंत मारुती घोडे (यश घोडे फोफसंडीकर) यांनी साहित्य, शिक्षण आणि समाजकारण या त्रिवेणीमध्ये उल्लेखनीय योगदान देत राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.

भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या लेखणीतून बालसाहित्य, निसर्ग, पर्यावरण, संस्कार आणि मूल्यांचे हृदयस्पर्शी दर्शन घडते.

इयत्ता 1 ते 3 साठी SERT, महाराष्ट्र (2025) अंतर्गत निवडून प्रकाशित. राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांपर्यंत पोहोचलेले पुस्तक.

‘निसर्गपूजक’ व ‘निसर्गाचे उपासक’ हे त्यांचे काव्यसंग्रह निसर्ग-पर्यावरण व मूल्यशिक्षणाचे संवेदनशील दर्शन घडवतात.

कुमशेत शाळेतील 1 ते 4 वीतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या निरागस भावकवितांचा त्यांनी संपादित केलेला सुंदर संग्रह ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारे उल्लेखनीय कार्य.

यशवंत घोडे सरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक-जागरूक विचारांचा खोल प्रभाव लाभलेला आहे.

गावागावातील परिवर्तनाची जाणीव जागवण्यापासून ते शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांपर्यंत ते सातत्याने सक्रिय आहेत.

त्यांच्या या साहित्यिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेत

१२ आणि १३ डिसेंबरला, दिल्ली येथे होणाऱ्या ४१ व्या भारतीय दलित साहित्य अकादमी अधिवेशनात,

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एस. पी. सुमनाक्षर यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

या गौरवशाली निवडीबद्दल लेखक रवी दलाल,

भारतीय दलित साहित्य अकादमी विदर्भ प्रदेशाध्यक्ष व

आदिवासी सेवक पुरस्कार विजेते विजय पोपेरे,

तसेच सर्व साहित्यिक मित्रपरिवारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments