प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
वैष्णवधाम ता.जुन्नर ,जि.पुणे येथील प्रगतीशील शेतकरी श्री भरत जाधव यांनी विकसित केलेल्या “जुन्नर गोल्ड” या आंब्याच्या नवीन वाणाला आज लखनऊ विद्यापीठामार्फत पेटेन्ट मिळाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री गणेश भोसले यांनी दिली. यावेळी अधिकारी व मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला.
महाराष्ट्र शासन - कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या मार्फत दिल्ली येथून लखनऊ विद्यापीठाकडे प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मसी राईट्स अथॉरिटी कडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यांनतर शास्त्रज्ञ डॉ रवि प्रकाश, डॉ विनीत सिंग यांनी प्रत्यक्ष पाहणी करून झाडाची पाने व फळे यांचे नमुने तपासल्या नंतर सर्व निकशांची पूर्तता झाल्यानंतर आज या वाणाला अधिकृत मान्यता मिळाली असून त्याचे पेटेन्ट मिळाले आहे.
यासाठी त्यांना मा. रफीक नायकोडी
संचालक विस्तार व प्रशिक्षण ,मा. विनय आवटे
संचालक नियोजन कृषी आयुक्तालय,पुणे , मा. दत्तात्रय गवसाने विभागीय कृषी सहसंचालक ,पुणे , मा.संजय काचोळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे , मा.कृषिरत्न अनिलतात्या मेहेर ,मा.कृषिभूषण जितेंद्र बिडवई , मा.सतीश शिरसाट उपविभागीय कृषी अधिकारी खेड ,मा.गणेश भोसले तालुका कृषी अधिकारी,. जुन्नर ,मा. प्रशांत शेटे प्रमुख शस्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र,. नारायणगाव ,मा.भरत टेमकर शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव , मा.बापू रोकडे कृषी अधिकारी ,प्रतीक्षा धायगुडे मंडळ कृषी अधिकारी , भाऊसाहेब बोकड,गणेश धाडवड ,सौ अनिता वाघुले ,भारती मडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
या वाणाची वैशिष्ट्ये :-
नियमित फाळधारणा होते, फळांचे वजन ८०० ते ९०० ग्रामपर्यंत आहे. ,फळांचा रंग बाहेरून पिवळा व आतून केशरी आहे ., चव हापूस ,केशर व राजपुरी मिश्रित असून अन्य वैशिष्ट्ये ही अहवालत नमूद केलेली आहेत.
भरत जाधव या प्रयोगशील शेतकऱ्याच्या संशोधनबाबत परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे .


Post a Comment
0 Comments