Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार तिसरा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा.

 


जुन्नर | जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील बोतार्डे गावातील प्रा.सतिश संतोष शिंदे यांच्या साप्ताहिक उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाचा तृतीय वर्धापन दिन मंगळवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी सकाळी ११ वाजता कार्यक्रम‍ाचे उद्घाटन व महापुरूषांच्या प्रतिमांचे पूजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना साप्ताहिक उद्याचा शिलेदारचे मुख्य संपादक प्रा.सतिश संतोष शिंदे यांनी मनोगतामधून मांडत आजपर्यंतचा साप्ताहिकाचा खडतर प्रवास व अनुभव व ८४ अंक कशाप्रकारे वर्षभरात काढले व पुढील वाटचाल कशाप्रकारे असेल तसेच शुभेच्छा त्यांनी यावेळी देत आलेल्या सर्व मान्यवर व कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम लोखंडे यांचे ऋण व्यक्त केले.

यानंतर शितल सतिश शिंदे संपादिका यांनी आपले मनोगत व्यक्त करून साप्ताहिक उद्याचा शिलेदारची पार्श्वभूमी सांगून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, बी. एम. थोरात सर यांनी साप्ताहिक उद्याचा शिलेदारला शुभेच्छा देत असताना म्हणाले की, सतिश शिंदे यांनी अतिशय ग्रामीण भागात हे साप्ताहिक सुरू केले असून एक ऐतिहासिक नांदी भविष्यकाळासाठी असणार अस त्यांनी आपल्या मनोगतमधून विचार व्यक्त केले, तसेच दिलीप वाघमारे म्हणाले की साप्ताहिक उद्याचा शिलेदार व त्याचे संपादक सतिश शिंदे शितल शिंदे व प्रशांत धोत्रे आयोजक यांना शुभेच्छा दिल्या, प्रशांत धोत्रे यांनी देखील आपले मनोगत मांडत असताना उद्याचा शिलेदार या साप्ताहिकाला जी काही मदत लागेल ती आपण सर्वजण मिळून भविष्यात करूया असा मानस त्यांनी यावेळी बोलताना केला, दिपक सोनवणे यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. गौरीताई सदाकाळ यांनी कार्यक्रमप्रसंगी भेट देऊन साप्ताहिक उद्याचा शिलेदार व आयोजकांना शुभेच्छा दिल्या तसेच आपली उत्तरोत्तर प्रगती होवो व आपल्या हातची लेखणी धारदार व्हावी अशाप्रकारच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम लोखंडे यांनी देखील साप्ताहिक उद्याचा शिलेदारच्या वाटचालीस व आयोजकांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देऊन चांगली वाटचाल व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली व आपल्याकडून काहीही मदत लागल्यास आपण ती करू असे आश्वासन त्यांनी अध्यक्षीय मनोगतामधून मांडले. सर्व सन्मानार्थी व उपस्थित मान्यवरांचे ट्रॉफी, सन्मानपत्र व गुलाबपुष्प व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अल्पउपहार जनार्दन मरभळ यांच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी तलांडे व आभार सतिश शिंदे यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments