प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आयोजीत शिवनेरीची जिजाऊ स्पर्धा २०२५ -( आईचे आपल्या मुलांवर होणारे संस्कार ) आदिवासी सांस्कृतीक भवन जुन्नर येथे रविवार दि.७ डिसेंबर रोजी संपन्न झाली. यामध्ये सौ. सायली गणेश रोकडे व कु.गार्गी गणेश रोकडे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाळे. दोघींचेही मनःपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये एकूण २५ मायलेक व मायलेकींच्या जोड्या सहभागी झाल्या होत्या. सर्व स्पर्धकांना आयोजकांतर्फे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. सौ. सायली गणेश रोकडे व कु. गार्गी गणेश रोकडे या मायलेकीच्या जोडीने त्यांच्या नृत्य अविष्कारा अविष्कारातून लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करणारे सादरीकरण करत, मुलांमध्ये, पुरुषांमध्ये व समाजामध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणारा संदेश दिला. द्वितीय क्रमांकांचे पारितोषिक धनश्री व रिद्धी जायकर, तृतीय क्रमांकांचे पारितोषिक डॉ. नेहा व रियांश दुबे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक वैशाली व साईराज कचरे यांना मिळाले.
याप्रसंगी या सर्व मायलेकरांना जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रसाद शिंगोटे, व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रुपए पाच हजार पाचशे पंचावन्न व प्रशस्तीपत्र असे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे डॉ. प्रदिप जोशी, डॉ. सचिन डुंबरे, डॉ. गणेश इंगवले, डॉ. सागर शिंदे, डॉ. देशपांडे, डॉ सोहेल ईनामदार, डॉ. विशाल आमले, डॉ. अमोल पुंडे, डॉ. शितल शिंदे, डॉ. स्वाती खोत व असोशीएशनचे सर्व सभासद डॉक्टर्स व जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व स्पर्धक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनाली शिंगोटे, डॉ. हिना ईनामदार व डॉ. स्वाती पवार तर परिक्षण आकाश डावखरे, डॉ. शुभांगी वलवणकर व मधुरा काळभोर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अल्फा इव्हेंट (विजय प्रजापती) यांनी केले.

Post a Comment
0 Comments