Type Here to Get Search Results !

आनंद मेळाव्यातून स्वयंरोजगाराचे धडे



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर

जुन्नर येथील श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त वि‌द्यार्थ्यांच्या व्यवसायिक कौशल्यांना चालना देण्यासाठी दि.15/01/2026 रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायिक दृष्टीकोन वृध्दींगत होऊन भविष्यात यशस्वी उद्योजक बनन्याची संधी यानिमित्ताने प्राप्त होईल.या उपक्रमामध्ये विविध खादयपदार्थ,हस्त कौशल्यावर आधारित तयार केलेल्या वस्तू या सारखे असंख्य स्टॉल उभारण्यात आले होते.स्टॉलचे नियोजन, भांडवल व्यवस्थापन,विक्री कौशल्य या बाबी विद‌यार्थ्यांना अनुभवता आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम बी.वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,आत्मविश्वास व व्यवसायिक तसेच उद्योजकीय दृष्टीकोनाचा विकास होतो असे मत व्यक्त केले.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे कौशल्य अवगत होईल व त्यांना निश्चितपणे उपयोग होईल अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.



 कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमारे,स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डी.बी.सोनार,उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते,एमसीव्हीसी प्रमुख प्रा.के.जी.नेटके, कार्यालयीन प्रबंधक सौ.एम.डी. कोरे,विविध शाखांचे प्रमुख तसेच आनंद मेळाव्याचे वरिष्ठ महाविदयालयाचे प्रमुख डॉ ई.डी. वाजगे,आनंद मेळाव्याचे कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन सौ व्ही.एम.बनकर,विभागतील सदस्य तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments