प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
आज गुरुवार दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मढ, ता. जुन्नर, जि. पुणे येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या सभागृहामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. यावेळी ४२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १९ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले.
रुग्णांना तपासणी,मोतिबिंदू शस्त्रक्रिया,प्रवास,निवास,जेवण ,चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.
मागील दोन वर्षात डिसेंट फाउंडेशन,पुणे , शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, विविध सामाजिक संस्था व तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून पाच हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून त्यांना नवीन दृष्टी मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
संपूर्ण जुन्नर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशनने केला असून, त्यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक संघ आम्हाला सहकार्य करत आहेत. तरी जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी या सुवर्ण संधी चा लाभ घ्यवा असे आवाहन डिसेंट फाउंडेशन चे संस्थापक
संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सदस्य गणेश मेहेर ,शंकरा आय हॉस्पिटल चे शिबिर समन्वयक ज्योती पाटील व त्यांची सर्व टीम, मढ येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मस्करे ,सचिव मुरलीधर मोढवे , दगडू मस्करे, निवृत्ती सदाकाळ,केशव घायवट, दत्तात्रय पानसरे , राजश्री कदम, आशा सेविका निलीमा मोढवे, संजीवनी बुट्टे आदी मान्यवर, नेत्र रुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments