खटकाळे | आज दिनांक 12.1.2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खटकाळे येथे राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. बाल सभेचे संपूर्ण नियोजन इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले असून सभेच्या अध्यक्षस्थान प्रतीक्षा वायळ हिने स्वीकारले.
सभेचे अध्यक्ष व उपस्थित यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारित आम्ही जिजाऊंच्या मुली या गीताचे गायन केले.
प्राजक्ता भवारी, स्वराली मोडक, शर्वरी वायाळ, प्रतीक्षा वायाळ आरुषी मोरे, अर्पिता गागरे, ते तेजस्विनी गागरे, आराध्या साबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी सर्वांना माहिती सांगितली . शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ काशीद मॅडम यांनी राजमाता जिजाऊ यांच्याकडून आपण कोणती शिकवण घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले तसेच शिक्षक श्री मुंढे सर यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष हिना शेख, सदस्य हिरा भवारी, पूजा मोडक, अंगणवाडी सेविका व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment
0 Comments