Type Here to Get Search Results !

धामणी येथील आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत घोडेगावच्या विद्यार्थ्यांचे यश



घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योती शिक्षण व आरोग्य संस्था धामणी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री. शिवाजी विद्यालय , ज्युनिअर कॉलेज व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, धामणी या ठिकाणी बीटस्तरीय भव्य वत्कृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, घोडेगावच्या इ.१ली ते १०वी मधील एकूण ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. ते विद्यार्थी खालील प्रमाणे

  *इयत्ता पहिली ते चौथी गटामध्ये* 

*१) कु.अभिनव तान्हाजी बोऱ्हाडे व कु.आर्या स्वप्निल वाळुंज या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक पटकावला असून बक्षीस स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम १२७० रु. मिळाले आहे.* 

*२) कु.अनया सिद्धेश्वर कांबळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला असून बक्षीस स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम ५१० रु. मिळाले आहे.*

*३) कु. अनुजा हर्षद राऊत हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून बक्षीस स्वरूपात ट्रॉफी , प्रशस्तीपत्र व रोख रक्कम ३७० रु. मिळाले आहे.*

*इयत्ता पाचवी ते सातवी या गटामध्ये* 

*१) कु. दुर्वा सुहास आवटे हिने प्रथम क्रमांक पटकावून ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र व रोख रक्कम २२०० रु. प्राप्त केले.*

*२) कु. समृद्धी दत्तात्रय डुकरे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून बक्षीस स्वरूपात ट्रॉफी प्रशस्तीपत्र व रोख रक्कम १२९० रु. मिळाले आहे.*

*इयत्ता आठवी ते दहावी या गटामध्ये* 

*१) कु. तनया दत्तात्रय बोऱ्हाडे हिला प्रथम क्रमांक मिळवला असून बक्षीस तिला स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम २२०० रु. मिळाले आहे* 

*२) कु.रचिता राजेंद्र बोऱ्हाडे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून बक्षीस स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम ७९० रु.मिळवले आहे.*

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिक्षिका सौ.वंदना वायकर, सौ.सुषमा फलके , सौ.सुनिता पांचाळ , सौ. प्रज्ञा घोडेकर, सौ. स्वाती शेटे यांनी मार्गदर्शन केले.आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष एडवोकेट संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव श्री. विश्वास काळे, संस्थेचे खजिनदार श्री सोमनाथ काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे, वसतिगृह कमिटीचे चेअरमन श्री सूर्यकांत गांधी, संस्थेचे संचालक श्री. अजित काळे,श्री. अक्षय काळे,तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती मेरीफ्लोरा डिसोजा ,उपप्राचार्या श्रीमती रेखा आवारी यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments