Type Here to Get Search Results !

एक हात मदतीचा सामाजिक बांधिलकीचा शाश्वत संस्थेचा अनोखा उपक्रम



घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना श्रीम प्रतिभाताई तांबे व सहकारी यांच्या अथक प्रयत्नाने दि . २३ / १२ /२०२५ रोजी मुलांचे वैयक्तिक आरोग्य निकोप व सुदृढ होण्यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्कृष्ठ दर्जाचे फूड (कीट) व दूध

 शाश्वत संस्थेकडून देण्यात आले . . पुढील तीन महिने अशाप्रकारे फूड (कीट ) दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुधारून त्यांचे वजन वाढण्यास मदत होणार आहे. व विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीतही नक्कीच वाढ होण्यास मदत होणार आहे. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक व विद्यार्थी यांना सुमारे १००० रु किमतीचे धान्यादी माल व दूध असे फूड (कीट ) देण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब बोऱ्हाडे, उपाध्यक्षा सौ.करवंदे मॅडम सर्व सदस्य उपस्थित होते . श्रीम रांजणे मॅडम, बेंढारी मॅडम, शिंगाडे मॅडम, क्षीरसागर सर , लांडे मॅडम यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक सौवीणा सदगीर यांनी संस्थेच्या सभासदांच व पालकांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments