Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे माघी श्री गणेश जयंतीनिमित्त श्रींचा जन्मोत्सव उत्साहात साजरा



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी माघी श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त अष्टविनायकापैकी एक तिर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथे पारंपारीक पद्धतीने व मोठ्या उत्साहात श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथील श्री गिरीजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासुन मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यानिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरात मोठी यात्रा भरली होती. ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदीरात सकाळी १० ते १२ या दरम्यान ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले तसेच यानिमित्त शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ ते शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे देवस्थानचे वतीने आयोजन केलेले आहे.



श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ०६.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे यांच्या हस्ते श्री गिरिजात्मज गणेशाचा विधीवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री गिरिजात्मज गणपतीचे हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. दिवसभर भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मंदिरात सकाळी १० ते १२ या दरम्यान ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे किर्तन झाले व पारंपारिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. त्यानंतर भाविक भक्तांकरीता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सुरेश वाणी, प्रभाकर गडदे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, विजय वर्‍हाडी, नंदकुमार बिडवई, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मंदिरात सकाळी ६ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६ वाजता महाआरती करण्यात आली. श्री गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आलेल्या भाविक भक्तांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची फळे तसेच धनंजय खंडू बिडवई यांनी एक कॅरेट केळी व राशीण येथील सृष्टी रमेश मसाल यांनी दोन कॅरेट केळी दिलीत. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घेतला तसेच जुन्नर परिसरातुन व पुणे, अहमदनगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक श्रींच्या दर्शनासाठी आले होते. श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त देवस्थानचे वतीने शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ ते शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. शुक्रवार दि.२३ जानेवारी २०२६ रोजी ह.भ.प.श्रावण महाराज अहिरे यांचे काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड.संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments