Type Here to Get Search Results !

ट्रेसेबल गिव्हिंग फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सर्व प्रकारच्या मदतीस जुन्नर तालुका कटिबद्ध... अमित बेनके यांचे प्रतिपादन...



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

फाउंडेशन करत असलेल्या कामाची समाजातील सर्व घटकांना माहिती व्हावी यासाठी वसंत व्हीला सभागृह नारायणगाव येथे आयोजित सहविचार सभेच्या निमित्ताने तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर आणि मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गणेश पूजन आणि गुरुवर्य सबनीस यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. श्री. महेंद्र गणपुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष नरेश सुराणा यांनी दुर्गम डोंगराळ आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्य पुस्तक योजना, ई लर्निंग साहित्य, संगणक लॅब अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी देवराम मुंडे, संग्राम फुलवडे, सारंग घोलप,अडव्होकेट नलावडे,डॉ रासकर,प्रकाश नेहरकर,के एस ढोमसे, पंकज घोलप, प्रदीप गाढवे,विकास दांगट, प्रवीण ताजणे, सतीश निमसे, कैलास करपे,संतोष ढोबळे, रविंद्र वाजगे, सचिन मुळे, खंडेराव ढोबळे,अंबादास वामन आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 



भविष्यकाळात AI चा वापर वाढणार असून त्या दृष्टीने ही संस्था नक्कीच प्रयत्न करेल अशी ही ग्वाही या निमित्ताने देण्यात आली. अशोक काकडे यांनी मान्यवरांचा परिचय करून देत सर्वाना ट्रॉफी देऊन गौरवण्याचे नियोजन केले. या उपक्रमाचे तांत्रिक टीम प्रमुख पूर्वेश व सहाय्यक करुणेश व नेहा मॅडम यांचाही गौरव झाला.तबाजी वागदरे यांनी सूत्र संचालन केले तर एम के ढोबळे यांनी आभार मानले.सुरेश कसार, रमेश वारुळे आदींनी नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments