प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर मराठी विभाग,मराठी वाङ्मय मंडळ,आणि (IQAC) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे प्रमुख डॉ.अभिजीत पाटील होते. त्यांनी "मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले".
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना नढे यांनी केले त्यांनी महाराष्ट्र राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे असे मराठी भाषेचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले
कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वरचित,प्रसिद्ध तसेच आपल्या आवडीच्या कविता सादर करून मराठी भाषेवरील प्रेम आणि साहित्य बद्दलच्या भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या काव्य सादरीकरणामुळे कार्यक्रमात उत्साही व साहित्यिक वातावरण निर्माण झाले.
संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नम्रता सोनवणे तर आभार प्रा विष्णू घोडे यांनी केले.




Post a Comment
0 Comments