प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
प्रयोग करण्यासाठी महागडी उपकरणे लागतात असे नाही. तुटपुंजा साहित्यात विज्ञान संशोधन करता येते. निसर्गाचे निरीक्षण करा. निसर्गाला प्रयोगशाळा माना असे विचार डॉ. रतिलाल बाबेल यांनी
खानापूर, तालुका जुन्नर या ठिकाणी व्यक्त केले व्यक्त केले.
शिवनेरी स्कूल व जूनियर कॉलेज,खानापूर या ठिकाणी विज्ञान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.रतिलाल बाबेल बोलत होते.
या प्रसंगी शिवनेरी फाउंडेशन चे सचिव शुभंकर कणसे,सीईओ सौ.श्रद्धा कणसे, कॅम्पस इनचार्ज राजेंद्र मुरादे,प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर पटाडे, प्राचार्य संजय मिश्रा, औषधनिर्माणशास्त्र प्राचार्य सचिन नागदेवे, उपमुख्याध्यापक अमोल थोरात.
संयोजक सौ.माधुरी पाटील,शैक्षणिक सल्लागार मनकुमारी शेरफा, सर्व स्टाफ व 350 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. रतिलाल बाबेल पुढे म्हणाले की, विज्ञानाच्या प्रगतीवर देशाची प्रगती अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवाव्यात. स्वदेशी विज्ञानाचा वापर करावा. प्रश्न विचारायला घाबरू नये. भारतीय शास्त्रज्ञांनी अपयशाला न घाबरता, समर्पण,सातत्य चिकाटी याद्वारे समाज उपयोगी संशोधन केले.
डॉक्टर सी. व्ही. रामन, डॉक्टर सी.एन.आर राव, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या तीन भारतीय शास्त्रज्ञांना भारतरत्न मिळाले असून त्यांनी तरुणांना संदेश देताना सांगितले की, उच्च ध्येय ठेवा. नवीन तंत्रज्ञानाची कास धरा. एक टक्के प्रेरणा व 99% मेहनत मानवाला यशस्वी बनवते. प्रत्येक गोष्टी मागील कार्यकारण भाव समजून घेण्याचा प्रयत्न करा.
यावेळी डॉ. रतिलाल बाबेल यांनी, सर आयझॅक न्यूटन, थॉमस अल्वा एडिसन, युक्लीड, आर्किमिडीज, निकोलस टेस्ला, लुई पाश्चर, अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे विनोदी किस्से सांगितले. डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी हळद व बासमती राईस यांच्या पेटंट बाबत दिलेल्या लढ्याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील समस्या समजावून घेऊन त्यावर उपाय म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग, संतुलित आहार, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, स्मार्ट सिटी, वैद्यकीय ॲप, पवन चक्की, जलविद्युत केंद्र यासारख्या 75 पेक्षा जास्त केलेल्या प्रयोगांचे कौतुक केले. कमी खर्चात, टिकाऊ, वाहतुकीस सोपे, वैज्ञानिक कसोटीवर उतरणारे वर्किंग मॉडेल पाहून विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक व संस्थाचालक यांचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सिद्धी देशमुख आणि कु.प्रतीक्षा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय मिश्रा यांनी केले.
उपस्थितांचे आभार सौ. माधुरी पाटील यांनी मानले.

Post a Comment
0 Comments