प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
एम. एस. जोशी सभागृह,नवी पेठ,पुणे येथे २ ते ५ जानेवारी मध्ये चार दिवस दुसऱ्या फुले फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून तसेच बेळगाव, तेलंगणा,गुजरात,
आंध्रप्रदेश,अबुधाबी,गोवा या ठिकाणाहूनही कवी कवयित्रींनी हजेरी लावली होती.फुलेप्रेमी संविधान दूत विजय वडवेराव हे या फेस्टिव्हलचे आयोजक आहेत.विशेष आकर्षण म्हणजे सर्व कवयित्री ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेत कवयित्री उपस्थित होत्या. सर्व कवयित्रींना आयोजक संविधान दूत विजय वडवेराव यांच्याकडून हिरवी साडी भेट देण्यात आली होती.फेस्टीव्हल साठी ७०० ते ८०० जणांची उपस्थिती होती.सकाळचा नाश्ता रुचकर जेवणाची मेजवानी आलेल्या सर्वांना मोफत देण्यात आला. सर्व कवींना संविधान पुस्तक, संविधानमय पॅड,सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.प्रत्येक जिल्ह्यात माझे संविधान माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात येतो यात संविधान दूत म्हणून कार्य करणाऱ्या फुले प्रेमींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दूत पुरस्कार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना फुलेप्रेमी समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जुन्नर येथील कवयित्री सरिता म्हेत्रे कलढोणे यांना हा मानाचा पुरस्कार या फेस्टिवलमध्ये प्रदान करण्यात आला. सरिता म्हेत्रे कलढोणे या जुन्नर येथे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Post a Comment
0 Comments