Type Here to Get Search Results !

कवी प्रा. पल्लवी रासकर लिखित काव्य रचना "तुझी आठवण"



 कवितेचे नाव-तुझी आठवण 


सांगते ऐक सख्या आपुल्या गोड आठवणी......

ज्या जपते मी अजूनही माझ्या मनोमनी...

लिहिल्या आहेत ज्या आपण आयुष्याच्या पानोपानी...

माळेत गुंफलेले जसे वेगवेगळे मणी...

तशाच आपुल्या सुखद आठवणी...

आठवणींची आठवण होताच येते डोळा पाणी...

त्या सुखद आठवणी म्हणजेच जणू उमललेली फुलेच रानोवनी...

अशाच या सुखद आठवणीत रंगून जावून लिहू आयुष्याच्या या वळणावर सुरेख जीवन गाणी...

आपुल्याच आठवणींचा ठेवा वाचताना नक्कीच प्रश्न पडेल या नव्या पिढीला कुणाच्या आठवणींची ही गोड कहाणी.


कवयित्री -प्रा.सौ.पल्लवी निलेश रासकर.

श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर.

Post a Comment

0 Comments