प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर, मन मेंदू व मनगट (3 H )बळकट करणारे वर्टेक्स स्कूल हे संस्काराचे केंद्र असल्याचे मत डॉ. रतिलाल बाबेल यांनी व्यक्त केले.
प्रियदर्शनी समाज विकास सहाय्य संस्था, मोहोने(कल्याण) संचलित वर्टेक्स स्कूल, मोहोने च्या स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रतिलाल बाबेल बोलत होते.
या प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर सौ. हर्षाली चौधरी,नगरसेवक रोहन कोट, पोलीस पाटील वासुदेव पाटील, सामाजिक युवा कार्यकर्ते वैभव भोईर,विजय पारख , प्रमोद घरत,सौ. अक्षदा बाबेल, सामाजिक कार्यकर्त्यासौ. रेखा हिरा ,शिवसेना उपशहर प्रमुख रमण तरे, प्रियदर्शनी समाज सहाय्य विकास संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक जे. सी कटारिया, माजी नगरसेविका व वर्टेक्स स्कूलच्या संचालिका सौ. माया कटारिया, स्कूल कमिटी अध्यक्ष मनीष कटारिया, सेक्रेटरी दीनानाथ पाटील, प्रिन्सिपल सौ. स्नेहा कटारिया, सर्व शिक्षक स्टाफ, वर्टेक्स स्कूल चे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यासंह राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी उपस्थित महापौर सौ. हर्षाली चौधरी-थविल यांनी सांगितले की वर्टेक्स स्कुल मध्ये शिक्षणाबरोबर संस्कार केले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सामाजिक बांधिलकीने काम करीत आहे.
वैभव भोईर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहून मन भारावून गेले, अंगावर रोमांच उभे राहिले. उपस्थित सर्वांना आपल्या बालपणाची आठवण झाली.कार्यक्रमा मधील विषय हे प्रबोधन करणारे होते. स्कूलच्या संस्थापिका सौ. माया कटारिया म्हणाल्या की, पुस्तकी शिक्षणाबरोबर आधुनिक जगतात उपयोगी पडणारे शिक्षण व मूल्य शिक्षण देण्याचे काम आमची संस्था करते.
वर्षभरात शाळेमध्ये झालेल्या विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा यातील सहभाग व प्रविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रके मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले. सर्वांचा यथायोग्य सन्मान संस्थेचे अध्यक्ष जे. सी. कटारिया, संचालिका सौ. माया कटारिया, मनीष
कटारिया, सौ. स्नेहा कटारिया यांनी केला.
सदर कार्यक्रम सौ. माया कटारिया यांचे मार्गदर्शन व स्कुल कमिटी अध्यक्ष मनिष कटारिया, सेक्रेटरी दीनानाथ पाटील, प्रॅन्सिपल सौ.स्नेहा कटारिया व सर्व शिक्षक यांनी सुनियोजन व मेहनत घेऊन आयोजित केला होता. यात शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विविध कार्यक्रमांमधून सहभागी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमीत वापर करणे, अपयशाने घाबरुन न जाणे, मी हे करू शकतो असा आत्मविश्वास बाळगणे,
ठरविली तर कोणतीही गोष्ट अथक परिश्रमाने अशक्य नाही, माहिती तंत्रज्ञानाची कास धरणे असा संदेश देताना डोळ्याची पारणे फिटतील असे सादरीकरण झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कार्यक्रमाने सर्व मान्यवर भारावून गेले. जीवनातील खेळाचे महत्व, ऑपरेशन सिंदूर या कार्यक्रमाने उपस्थित सर्वजण भावूक झाले.दोन सत्रात एकूण 20 कार्यक्रम सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. माया
कटारिया यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रिन्सिपल सौ. स्नेहा कटारिया यांनी मानले. कार्यक्रमाचे नीटनेटके सूत्रसंचालन सौ. संध्या पाटील यांनी केले.

Post a Comment
0 Comments