प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
स्वयंभू जललिंग तिर्थक्षेत्र श्री हरिश्चंद्र महादेव मंदिर महाशिवरात्री उत्सवासाठी सज्ज झाले असून मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे.
महाशिवरात्र उत्सव हा शिव पार्वती विवाह सोहळा म्हणून मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होतो .शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्री हरिश्चंद्र महादेव मंदिरात हळदी समारंभ होणारा असून शिवलिंगास वर्षातून एकदाच हळदीचे लेपन केले जाते. त्यानंतर देवाची उष्टी हळद श्री कमलजा भवानी देवीस सवाद्य मिरवणुकीने अर्पण केली जाणार आहे.रविवार दिनांक 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीस पहाटे पवित्र शिवलिंगास पंचामृत अभिषेक होऊन भस्म आरती होणार आहे.त्यानंतर मंदिर भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे सकाळी साडे दहा वाजता गायत्री महामृत्युंजय यज्ञ संपन्न होणार असून सायंकाळी चार ते सात संगीत भजने होऊन सात वाजता गोपूजन व नंदी पूजन करून शिवपार्वती विवाह सोहळ्यास सुरुवात होणार आहे. साडेसात वाजता महाआरती होऊन शिवपार्वती उत्सव मूर्तींची मंदिर प्रदक्षिणा होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी भाविक भक्तांनी या महाशिवरात्री पर्वाचा लाभ घ्यावा असे तीर्थक्षेत्र श्री हरिचंद्र महादेव संस्थानच्या विश्वस्त व सल्लागार मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments