Type Here to Get Search Results !

समर्थ च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत यश



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बँगलोर व सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "अन्वेषण" या राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेत समर्थच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याची माहिती समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे व गुरुकुल चे प्राचार्य सतिश कुऱ्हे यांनी दिली.

ही स्पर्धा सॅमसंग सेमिकन्डक्टर इंडिया रिसर्च यांनी पुरस्कृत केली होती.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या सहयोगाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्पर्धा बँगलोर येथे आयोजित करण्यात आली होती.



शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमधील असलेल्या नवउपक्रमशीलतेला,नवनवीन कल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या विज्ञान आणि तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत असलेले प्रीतम बर्वे,श्रुती वाकचौरे व समर्थ गुरुकुल मधील अवधूत भांबेरे, श्रद्धा आग्रे या ग्रुप ने सादर केलेल्या "व्हर्साटाईल सर्विस बोट " या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला.रुपये ४० हजार रोख,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

स्मार्ट सर्व्हिस रोबोट हा शाळा, कॉलेज,ऑफिस, हॉस्पिटल आणि उद्योगांमध्ये अशा विविध क्षेत्रांमध्ये सर्व्हिस देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.रोबोट हा सेन्सर्स आणि मायक्रोकॉन्ट्रलरच्या मदतीने स्वयंचलितपणे कार्य करतो.लोकांना मदत करणारा स्मार्ट रोबोट प्रश्नांची उत्तरे देणारा AI प्रणाली,मानवी चेहरा ओळखणारी प्रणाली विकसित करणे यासाठी या प्रकल्पाचा वापर करण्यात आल्याचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी यांनी सांगितले.

हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.प्रियांका लोखंडे,प्रा.सुचिता साबळे,प्रा.कौस्तुभ मेहेर,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, एच पी नरसुडे,संजीवनी गायकवाड,वैशाली सरोदे यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments