शिरोली बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेला आनंदी बाजार उत्साहात पार पडला. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक अंबादास वामन यांनी दिली. शाळेच्या भव्य प्रांगणात रंगीबेरंगी सजावट,आकर्षक स्टॉलची मांडणी व विद्यार्थ्यांच्या उत्साहावर्धक सहभागामुळे आनंदी बाजार आनंदमय वातावरणात पार पडला. आनंदी बाजाराचे उद्घाटन शिरोली तर्फे आळे गावच्या सरपंच सौ प्रियाताई खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले व स्टॉलचे पूजन जेष्ठ नागरिक दगडू भाऊ डावखर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश खिलारी ,उपाध्यक्ष रवींद्र आगळे, राज्य पुरस्कार विजेते शिक्षक रामभाऊ सातपुते ,अजितशेठ खिलारी, सुरेश शेठ जगदाळे, राजू शेठ पोळ ,योगेश शेळके सर, बाजीराव मुळे, मुलानी गुरुजी, सुभाष खिलारी अनिल खिलारी, तुकाराम खिलारी, नामदेव खिलारी, महादू खिलारी ,रखमा खिलारी ,अंगणवाडी सेविका, शिरोली व सुलतानपूर गावातील ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध वस्तूंची खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला.
या आनंदी बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ खेळणी कडधान्य आपल्या शेतामध्ये पिकविलेला भाजीपाला इत्यादी वस्तूंचे आकर्षक स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून त्यांच्यातील व्यवहार ज्ञान, आत्मविश्वास व उद्योजकता विकसित होण्यास मदत झाली. आनंदी बाजारात 30 हजार रुपयाची उलाढाल झाली आनंदी बाजारात खाऊ गल्लीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकनाथ तट्टू सर ,हमीद पटेल सर, मनीषा चौधरी मॅडम, वैशाली सातपुते मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व व्यवहार ज्ञानाला वाव मिळतो असे मत व्यक्त केले.


Post a Comment
0 Comments