प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
आंबेगाव गावठाण 19 फेब्रुवारी 2020 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली शाळेतील चिमुकल्यांनी विविध ऐतिहासिक भूमिका साकारत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी संपूर्ण शाळा परिसर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होती. कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये १)प्रेरणादायी पोवाडे- शाळेतील विद्यार्थ्यांनी पहाडी आवाजात शिवरायांच्या शौर्याचे वर्णन करणारे पोवाडे सादर केले. २)सांस्कृतिक नृत्य -लहान मुलांनी महाराष्ट्र गीत आणि शिवराज्याभिषेक या गीतावर आकर्षक सुंदर नृत्य सादर केले.
३)विद्यार्थ्यांची भाषणे -प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी शिवरायांचे बालपण, जिजाऊंचे संस्कार यावर प्रभावी भाषणे गेली
४) वेशभूषा -अनेक विद्यार्थ्यांनी मावळे ,तानाजी मालुसरे आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. *मान्यवरांचे मत- शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याची व सर्वधर्म समभावाची माहिती दिली. लहान वयातच मुलांवर शिवरायांच्या विचाराचे संस्कार व्हावेत या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे त्यांनी यावेळेस नमूद केले या सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने आली.


Post a Comment
0 Comments