Type Here to Get Search Results !

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये पारंपारिक पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी



प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे

न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव येथे विद्यार्थ्यांनी पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय कार्याची गाथा सांगणारे कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व पारंपारिक पेहराव करून कार्यक्रमास उपस्थित होते. केले. पोवाडा, शिवस्तुती गीते, सादर करण्यात आले. गड आला पण सिंह गेला हि नाटिका सादर करण्यात आली.. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाल संभाजी, राजमाता जिजाऊ, मावळे,यांची वेशभूषा केली होती. कार्यक्रमात सुरुवातीला आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री तुकाराम काळे, उपाध्यक्ष एडवोकेट संजय आर्वीकर कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी प्रशांत काळे,विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक श्री सोमनाथ भाऊ काळे, विद्यालयाच्या प्राचार्या मेरी फ्लोरा डिसोजा, उप प्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर, पालक शिक्षक संघाच्या सदस्य,यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.प्री प्रायमरी विभागाच्या मुलांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक श्री समीर मुजावर यांनी सुंदर देखावा साकारला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ .९ वी च्या विद्यार्थिनी कु. आयुषी पडवळ व स्वर्णिमा डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक प्रज्ञा घोडेकर यांनी केले. जयंती साजरी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मोनिका भालेराव, प्रज्ञा घोडेकर, ज्योती जाधव, चेतन पोखरकर, संगीता करपे, सुप्रिया मंडलिक, स्वाती शेटे,गंगाराम तनपुरे, ज्योती रोकडे,संतान आसंगी, विजय काळे सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच सुरज काळोखे यांनी सहकार्य केले. प्राचार्यांनी आपल्या भाषणातून शिवजयंती साजरी करून शिव विचार आत्मसात करावे असे सांगितले. केवळ एक दिवसापूर्वी शिवजयंती साजरी न करता आपण आपल्या जीवनात शिवाजी महाराजांचे विचार धाडस कर्तृत्व तसेच जिजाऊंचे संस्कार आपण अंगीकारले पाहिजेत, निस्वार्थपणे समाजाची व देशाची सेवा केली पाहिजे, असे प्राचार्या मेरीफ्लोरा डिसोझा यांनी सांगितले. शिवजयंती साजरी करत असताना सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. शालेय परिसर चैतन्यमय वातावरणाने प्रफुल्लीत झाला होता.गेला होता.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments