प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
घोडेगाव-घोडेगाव ता. आंबेगाव जिल्हा पुणे मंचर घोडेगाव रस्त्या लगत जुगार खेळली जात असल्याचे घोडेगाव ग्रामपंचायत यांनी प्रशासनास पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले असताना देखील यावर कारवाई होताना दिसत नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे.घोडेगाव हे आंबेगाव तालुक्याचे मुख्य गाव असल्याने घोडेगाव मध्ये तहसील कार्यालय न्यायालय व पोलीस स्टेशन असल्याने देखील या जुगार अड्ड्यावर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे
प्रशासन यावर कारवाई करण्यासाठी का मागे पुढे पाहत आहे असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला असून यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे
घोडेगाव ग्रामपंचायत यांनी कुठे जुगार चालू आहे याबाबतची संपूर्ण माहिती पत्रामध्ये नमूद केली असून देखील यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे सांगितले असताना देखील कारवाई होत नाही यामध्ये कोणी राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे

Post a Comment
0 Comments