प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली येथे माजी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा रोहिदास भालेराव कृषी उपसंचालक महाराष्ट्र शासन (क्लास वन) नेमणूक झाल्याबद्दल सत्कार समारंभ आणि Room to read या उपक्रमांतर्गत वाचनालयाचे उद्घाटन असे दुग्ध शर्करा योग दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी माननीय श्री भालचंद्र बोराडे, श्री शाम बोराडे, मधुअप्पा बोराडे ,सुरेश बोराडे,गणेश बोराडे,पांडुरंग हिंगणे, ॲड .प्रकाश शहाणे, सिद्धांत मोरे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण बोऱ्हाडे, उपाध्यक्षा सुनंदा करवंदे, सदस्या शितल बो-हाडे, प्रियंका डुंबरे, मनिषा साबळे, किरण ढेरंगे , ओंकार भालेराव, विजय बोऱ्हाडे, नवनाथ हिंगणे, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लेझीम च्या तालावर व फुलांच्या वर्षावात जल्लोषात ऋतुजा दिदीचे स्वागत केले. ऋतुजाच्या हस्ते Room to Read वाचनालयाचे उद्घाटन केले.
मान्यवरांच्या हस्ते गौरवचिन्ह, शाल, फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन कृषी उपसंचालक ऋतुजा भालेराव (class - । ) हिचा सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापिका सौ. वीणा सदगीर यांनी थोडक्यात यशाला गवसणी घालणारी ऋतुजा हिची यशोगाथा सांगितली.
ऋतुजाने मनोगतात अभ्यास कसा केला? व विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करून ध्येयाप्रद जाण्यासाठी अभ्यासात सातत्य
ठेवावे. याबद्दत मार्गदर्शन केले त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. श्री. भालचंद्र बोऱ्हाडे यांनी आम्ही विद्यार्थी व शाळेला सतत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मधुआप्पा बोऱ्हाडे, शाम बोऱ्हाडे यांनी ऋतुजाचे कौतुक केले. शाळेप्रती आदर व्यक्त केला. भिमाशंकर विद्या मंदिर शिनोलीचे आदरणीय गवारीसर यांनी ऋतुजा चे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
माजी विद्यार्थी अँड. प्रकाश शहाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेविषयी गौरवोदगार काढले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका श्रीम शैला रांजणे यांनी केले . श्रीम. सुलोचना बेंढारी, श्री. निलेश क्षीरसागर सर, आनिता लांडे या शिक्षकांनी कार्यक्रमाची नियोजन बद्ध व्यवस्था केली. व चंद्रकला शिंगाडे यांनी सर्वांचे गोड आभार मानले.

Post a Comment
0 Comments