प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे
अखंड हिंदुस्तानचे दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे माननीय जोशी तात्या श्री. बाळकृष्ण बोराडे शा. व्य. समिती अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
विद्यार्थ्यां ची छत्रपतींच्या जयजयकार करत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. "शिवाजी महाराजांनी जुलमी सत्तेपासून सर्वसामान्यांचा बचाव केला. हिंदवी स्वराज्य स्थापन केले. म्हणूनच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत असे मुख्याध्यापिका सौ.सदगीर मॅडम यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतीचा जयजयकार केला शिवरायांचे शौर्य पराक्रम यांची गाथा गाणाऱ्या, त्यांच्या जीवनाचा परिचय देणाऱ्या कथा, उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहतील अशी मनोगते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई, तानाजी ,बाजी, मुरारबाजी विविध मावळे इत्यादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा वेशभूषेतून साकारल्या होत्या. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनींनी शिवरायांवर आधारित नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक हलगीच्या तालावर विविध कलाकृती साकारत लेझीम नृत्य सादर केले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन दिग्दर्शन व मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीमती रांजणे मॅडम, बेंढारी मॅडम, शिंगाडे मॅडम , लांडे मॅडम व श्री . क्षीरसागर सर यांनी केले . मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन टीम व शिक्षकांचे या कार्यक्रमामुळे विशेष कौतुक केले व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सुद्धा तत्पर राहू असे व्यक्त केले

Post a Comment
0 Comments