Type Here to Get Search Results !

घोडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी श्री राजेंद्र काळे यांची बिनविरोध निवड



प्रतिनिधी घोडेगाव : सुरंजन काळे 

घोडेगाव- घोडेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक कै. जयसिग मानाजी काळे यांचे निधन झाल्याने सर्वसाधारण जागा रिक्त झाली होती. या जागेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली या रिक्त जागेसाठी एकच अर्ज आल्याने श्री राजेंद्र जयसिंग काळे यांची बिनविरोध निवड झाली निवडणुकीचे निवडणुक अधिकारी म्हणून श्री विवेकजी वाघमारे यांनी काम पाहिले निवड झाल्यानंतर श्री राजेंद्र जयसिंग काळे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन श्री सखाराम हरिभाऊ काळे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री सोमनाथ वसंतराव काळे यांनी सर्व संचालक व नवनियुक्त संचालक यांच्या आभार मानले

Post a Comment

0 Comments