Type Here to Get Search Results !

कवी पल्लवी रासकर लिखित काव्यरचना "राजा शिवछत्रपती"

 


कवितेचे नाव-"राजा शिवछत्रपती"


आमच्या जुन्नर चा मान आणि सन्मान राजा शिवछत्रपती शिवनेरी जन्मस्थान 🚩

केवळ आमच्या जुन्नरचाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचा अभिमान🚩

शिवजयंतीच्या दिवशी गडावर असतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूजेचा मान 

राजांनी घेतली होती स्वराज्य स्थापनेची आण🚩

स्वराज्याचे तोरण बांधून राजांनी दिला माता-भगिनींना सन्मान 

कारण हिरकणी मातेला देखील कडा उतरताना नव्हते राहिले स्वतःचे भान 

म्हणूनच बुरुजाला दिला महाराजांनी हिरकणीचा मान

आई तुळजाभवानी आणि माता जिजाऊ यांना सतत स्मरून राखला आपल्या भगव्याचा मान 🚩

शिवजयंतीला मावळे येती पेटत्या मशाली नी झेंडे फडकवत राजांप्रती व्यक्त करण्याआदर सन्मान 

अशा माझ्या राजाला कोटी कोटी प्रणाम🙏🚩

स्वीकार करा राजे आमच्या या शिवभक्तांचा सलाम🙏🚩🚩

 कवयित्री-प्रा. सौ पल्लवी निलेश रासकर. 

श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर.

Post a Comment

0 Comments