जुन्नर प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष व जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबीर महाविद्यालयाच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये संपन्न झाले.या शिबीरामध्ये १४० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. एक दिवसीय शिबीर तीन सत्रांमध्ये पार पडले.
शिबीराच्या प्रथम सत्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी व उद्घाटनपर सत्र पार पडले . यामध्ये प्रा.विलास कुलकर्णी अध्यक्ष प्रतिनिधी यांनी उद्घाटनपर मनोगतामध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या व उपाययोजना यावर मार्गदर्शन केले.द्वितीय सत्रामध्ये प्रथम व्याख्यानामध्ये डॉ.राजेंद्र कांकरिया यांनी जेष्ठांचे आरोग्य व अंधश्रद्धा या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करताना जेष्ठांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी असे नमूद केले. त्याचबरोबर शारीरिक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता योग्य वैद्यकीय उपचार वेळेवर घ्यावेत असे मत मांडले. व्दितीय व्याख्यानामध्ये प्रा.मुबीन तांबोळी यांनी हास्य हंडी धम्माल एकपात्री प्रयोग सादर करून मनोरंजनात्मक प्रबोधन केले .तृतीय सत्रामध्ये प्रा.डॉ.फकीर आतार यांनी आनंदी श्रेष्ठत्व या विषयावर मार्गदर्शन करताना राज्य शासनाच्या जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वृद्धाश्रम,मातोश्री वृद्धाश्रम,श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना,जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र इ योजनांची माहिती जेष्ठ नागरिकांना दिली. चतुर्थ व्याख्यानामध्ये प्रा.एकनाथ डोंगरे यांनी क्रियाशील वृद्धत्व या विषयावर मार्गदर्शन करताना जेष्ठांसाठी योगसाधनेचे महत्व विशद केले.
सदरच्या शिबीरामध्ये मध्ये एकूण चार व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आलेले होते.
शिबिराप्रसंगी जुन्नर तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यामध्ये प्रा .एकनाथ डोंगरे अध्यक्ष जुन्नर तालुका जेष्ठ नागरिक संघ समन्वय समिती,डॉ.फकीर आतार,पांडूरंग मोढवे यासह बुहसंख्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य व बहिःशाल केंद्राचे केंद्राध्यक्ष प्रा.डॉ.महादेव वाघमारे शिबीराच्या अध्यस्थानी होते . त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये जेष्ठ नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे असे नमूद करून शिबिरासाठी मार्गदर्शन केले.शिबीर प्रसंगी अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी,उपप्राचार्य डॉ.रविंद्र चौधरी,डॉ.सतीष जाधव यासह मान्यवर उपस्थित होते
संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
शिबिराचे आयोजन बहिःशाल शिक्षण केंद्राचे केंद्र कार्यवाह प्रा.संतोष गवळी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.एकनाथ वाजगे यांनी केले.



Post a Comment
0 Comments