Type Here to Get Search Results !

वाणिज्य शास्त्र हेच जीवन जगण्याचे शास्त्र - सी.ए. राजेश डांगी



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर 

जुन्नर : जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र यांच्या वतीने “वाणिज्य शाखेतील करिअरच्या विविध संधी” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सनदी लेखापाल राजेश डांगी उपस्थित होते. त्यांनी वाणिज्य शाखेतील विविध रोजगाराच्या क्षेत्रांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. सनदी लेखापाल,किंमत व लेखा तज्ज्ञ,कंपनी सचिव,बँकिंग व वित्त,व्यवस्थापन,उद्योजकता, इक्विटी सायन्स अँड चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट तसेच संशोधन अशा विविध क्षेत्रांतील संधींचा त्यांनी परामर्श दिला. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करत योग्य करिअर निवडीसाठी आवश्यक दिशा व मार्गदर्शक सूचना त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे तसेच अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे व उपप्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक विचार दिले.तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सतिश जाधव, डॉ. पुनम माने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा.श्रद्धा रेणुकदास यांनी तर डॉ.पल्लवी निखळ यांनी आभार मानले.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील विविध करिअरच्या वाटांचा व्यापक आढावा मिळाला असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी आत्मविश्वास व स्पष्ट दिशा प्राप्त झाली आहे.

Post a Comment

0 Comments