Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात मसाले उद्योगातून रोजगार निर्मिती या विषयावर कार्यशाळा



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर   

जुन्नर श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंच विभागामार्फत आज मसाले उद्योगातून रोजगार निर्मिती या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शिवनेरी मसालेच्या संचालिका सौ स्वाती कबाडी यांनी व्यवसाय सुरू करताना पासूनचे आपले अनुभव कथन करून छोट्या छोट्या भांडवलातून प्रथम लघुउद्योग कसा सुरु करावा.वित्तीय व्यवस्थापन कसे करावे ,याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले एकाच वस्तूचे उत्पादन करण्यापेक्षा छोट्या छोट्या अनेक वस्तूंचे उत्पादन करून नफा कसा मिळवता येतो. याविषयी त्यांनी आपले अनुभव विद्यार्थिनींना सांगितले तसेच विविध खडे मसाले यांची माहिती विद्यार्थिनींना दिली. 



तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य .प्रा. डॉ.रवींद्र चौधरी यांनी सरकारी नोकऱ्यांच्या मागे न लागता घरबसल्या लघुउद्योग चालू करून विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी प्रयत्न करावेत. गांडूळ खत,खेकडे पालन,कुक्कुटपालन यासारख्या अनेक व्यवसायातून कसे जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येईल याचे मार्गदर्शन करून ही कार्यशाळा राबवल्याबद्दल विद्यार्थिनी मंच विभागाचे कौतुकही केले. संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.सतीश जाधव,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.वंदना नढे,विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा.डॉ.वर्षा देसाई आणि विद्यार्थिनी मंचाचे सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी मंच प्रमुख प्रा.डॉ. वर्षा देसाई यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी मुलींना पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चालायचे असेल तर आपल्याला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे आणि यासाठी फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात आपले मन गुंतवा असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रेखा गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.डॉ. रंजना पुराणे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments