घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे
घोडेगाव : न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, घोडेगाव येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मराठी भाषेच्या गौरवगीताने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे, कविता सादरीकरण, नाटिका तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे उपस्थितांचे मन जिंकले.
शिक्षकांनी मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून तिचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची आहे, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री. अँड. संजय दत्तात्रय आर्वीकर, कार्याध्यक्ष माननीय श्री. सुरेश शेठ भिमाजी शेठ काळे,चेअरमन समन्वय समिती माननीय श्री राजेश कैलास शेठ काळे, चेअरमन न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल घोडेगाव माननीय श्री बाळासाहेब काशिनाथ काळे,शाळेच्या प्राचार्या श्रीमती मेरी फ्लोरा डिसूजा, वंदना वायकर मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments