घोडेगाव प्रतिनिधी : सुरंजन काळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली येथे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले व विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली .त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गोडुल्या शब्दात भाषणातून मराठीचे सौंदर्य व महत्त्व सांगितले राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता वाचन ,निबंध स्पर्धा, गायन, हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,लघुनाटिका स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले.
श्रीमती सुलोचनाबेंडारी श्रीमती चंद्रकला शिंगाडे श्रीमती शैला रांजणे या शिक्षकांनी मराठी भाषेचे महत्व पटवून दिले आणि मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विना सदगीर यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले


Post a Comment
0 Comments