प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे मराठी विभागामार्फत 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदी विभाग प्रमुख डॉ.कॅप्टन बाबासाहेब माने होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना नढे यांनी केले.प्रास्ताविकातून कुसुमाग्रजांच्या साहित्य संपदेचा आढावा घेत त्यांनी मराठी साहित्याला दिलेले मोलाचे योगदान विद्यार्थ्यांसमोर मांडले. मराठी भाषा वारकरी संप्रदायांपासून मोठी होत होत आता अभिजात दर्जाची झाली आहे याचे महत्त्वही त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना सांगितले.
अध्यक्षीय मनोगतातून प्रा.डॉ.कॅप्टन बाबासाहेब माने यांनी मराठी भाषेची रचना आणि महत्त्व सांगत आपली भाषा इंग्रजी,फारसी,गुजराती,हिंदी भाषांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक बनली आहे. तिचे संवर्धन आणि संगोपन करणे हे आजच्या युवकांच्या हातात आहे असे प्रतिपादन केले.आजच्या युवकांनी सर्जनात्मक आणि सृजनात्मक लेखन करून मराठी साहित्यात भर घातली पाहिजे असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. यावेळी एक अनोखी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये एकूण १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पत्रवाचन,कविता वाचन आणि शब्दकोडी सोडवणे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन भाषा गौरव दिनानिमित्त करण्यातआले.कार्यक्रमासाठी मराठी विभागाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होत.
कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजयराव शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी,प्राचार्य डॉ महादेव वाघमारे,उपप्राचार्य डॉ.रवींद्र चौधरी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वर्षा देसाई यांनी केले तर आभार प्रा.विष्णू घोडे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments