Type Here to Get Search Results !

श्री शिव छत्रपती महाविद्यालयात ‘योगा आणि स्ट्रेस मॅनेजमेंट’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर 

जुन्नर :जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथील वाणिज्य विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने “योगा आणि स्ट्रेस मॅनेजमेंट” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षका सौ प्रतिभा शेरकर व नॅचरल फार्मिंग अँड हॅपिनेसच्या शिक्षक सौ सुचिता कुलवडे उपस्थित होत्या. त्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर करत ताण तणाव व्यवस्थापन, मानसिक संतुलन आणि सकारात्मक विचार सरणीचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून करिअर निवडीबाबत आवश्यक दिशा व मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ.रविंद्र चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सतीश जाधव व डॉ.पुनम माने यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका बनकर तर डॉ. शाल्मली जुवेकर यांनी आभार प्रदर्शन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे महत्त्व पटले असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी आत्मविश्वास व स्पष्ट दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments