प्रतिनिधी : सुरंजन काळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिनोली येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एका विशेष विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन गावचे सरपंच माननीय मंगेश पारधी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले त्यांच्याबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाळकृष्ण बोराडे, सदस्य किरण ढेरंगे ,युवा उद्योजक गणेश बोराडे ,ज्येष्ठ नागरिक श्री बाजीराव शिनोलीकर ,स्क्विरल रिसॉर्टचे मॅनेजर माननीय श्री उगले सर मुख्याध्यापक सो विना सदगीर श्रीमती सुलोचना बेंढारी,श्रीमती शैला रांजणे ,श्रीमती अनिता लांडे ,श्रीमती चंद्रकला शिंगाडे इत्यादी शिक्षक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मॉडेल्समध्ये पाण्याचे शुद्धीकरण, ज्वालामुखी सौरमाला पाण्याचे चक्र ,पवनचक्की फुफुसे, शेतीवर आधारित प्रयोग इत्यादी माहिती पूर्ण वर्किंग मॉडेल्स तयार केली होती. विज्ञानावर आधारित रांगोळ्यांचाही समावेश होता पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रयोगाची माहिती विचारून घेतली त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विज्ञान दिनाचा उद्देश विज्ञानाबद्दल जागरूकता वाढवणे ,वैज्ञानिक दृष्टिकोन प्रोत्साहित करणे आणि विद्यार्थ्यांना विज्ञानात रुची निर्माण करणे हा आहे असे सांगून विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.


Post a Comment
0 Comments