Type Here to Get Search Results !

हिंदी काव्य,कहानी,गीत व शेर-शायरी कार्यक्रम उत्साहात संपन्न



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर 

जुन्नर: श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी काव्य,कहानी,गीत व शेर-शायरी सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचे सृजनात्मक लेखन कौशल वाढविणे,त्यांना साहित्य लिहिण्यास प्रवृत्त करणे,त्यांची स्टेज डेरिंग वाढविणे व सादरीकरण करण्याची कला वृद्धिंगत करणे हे प्रमुख मुद्दे या कार्यक्रमाचे होते.           



कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी,प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे व उपप्राचार्य डॉ.रविंद्र चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्ज्वलित तसेच सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. 

कु श्वेता गायकवाड या विद्यार्थिनीने आपल्या सुरेल आवाजात गणेश वंदना गायली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ.कॅप्टन बाबासाहेब माने यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात काव्य,कहानी व शेर-शायरी कशी सादर करावी या बद्दल विद्यार्थ्याना सविस्तर माहिती दिली.तसेच आवाजातील चढ-उतार,शब्दफेक,हावभाव, स्टेज वरती उभे राहण्याची कला याबद्दलची सूक्ष्म माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अनिल काळे यांनी लेखन कला विकसित करण्यासाठी विद्यार्थ्याना वाचन,श्रवण व लेखन करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यावर भर देण्यास सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी सतत लेखन कार्य करावे.जिथे संधी मिळेल तिथे सादर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.       

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉमर्स विभाग प्रमुख डॉ.सतिश जाधव, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा विक्रम रसाळ, मराठी विभाग प्रमुख डॉ.वंदना नढे,डॉ.वर्षा देसाई,प्रा.संतोष गवळी,प्रा.ज्ञानेश्वर सोनार, प्रा.योगेश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.  

प्रा.रेखा गायकवाड यांनी आपल्या सुरेल आवाजात गीत गाऊन सादरीकरण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला. तद्नंतर अल्फिया पठाण,श्वेता गायकवाड,लक्ष्मी काळे,उर्मिला शेळकंदे,सौरभ शिंदे,ऋषिकेश वाबळे,मयूर गावडे,मयूर रावते, प्रणव ताजवे,रुपाली तळपे,रामेश्वर शिंदे,स्मितेश जगताप,आर्यन लांडे,गायत्री मंडलिक,जय नऱ्हे,मयुरी घोगरे, आरती खुंटले,काजल कडाळे, सानिका दातखिळे,रुक्षिका केदारी,आदित्य कुमकर, गुरु शेळकंदे,आदित्य घोगरे,संकेत घोगरे,समीर मुंढे, मयूर खंडागळे,रोशन तळपे अशा एकूण 35 विद्यार्थ्यांनी व डॉ.वंदना नढे,डॉ.वर्षा देसाई, प्रा. संतोष गवळी इत्यादी प्राध्यापकांनी काव्य,कहानी, गीत व शेर-शायरीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्फिया पठाण व आभार प्रदर्शन प्रा.रेखा गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात एकूण ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments